Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास
एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासात एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाकिटातील चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. हा प्रकार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दांडेकर पूल ते निगडी प्रवासा दरम्यान घडला.
किशोर सखाराम सोंडकर (वय 59, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर यांचे वडील सखाराम सोंडकर (वय 85) हे दांडेकर पूल, पुणे येथून निगडीकडे पीएमपीएमएल बसने येत होते. या प्रवासादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 10 तोळे सोन्या- चांदिचे दागिने असलेले पाकीट चोरून नेले. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.