Pimpri : गुलाबराव तापकीर यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – वसुंधरा स्वच्छता अभियान यांच्या प्रेरणेतून गेली बारा वर्षे गुलाबराव तापकीर (अण्णा) यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो. वय वर्ष 87 पूर्ण करणाऱ्या अण्णांचा वाढदिवस यावर्षी विविध पर्यावरण जागृती कार्यक्रम करूनच बाणेर येथे साजरा करण्यात आला.

पर्यावरणाचा जागर आणि प्रबोधन अशी रूपरेषा असलेल्या जेष्ठ गुलाबराव अण्णा यांचा 87 वा वाढदिवस आनंदात साजरा झाला. याप्रसंगी नगरसेविका स्वप्नाली सायकर व ज्योती कळमकर तसेच इतर महिलांच्या वतीने अण्णांचे औक्षण करण्यात आले. वाढदिवसानिम्मित हवामान बदल साक्षरता याविषयी 1.5 किलोमीटर शालेय विधार्थी व नागरिकांनी मिळून पायी मूक रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी लेझीम नृत्यही सादर केले.

हवामान मित्र परिषदच्या वतीने विविध विषयांना यावेळी हात घालण्यात आला यामध्ये योगा व्यायामाचे महत्व , मोबाईल चे दुष्परिणाम , रस्ता सुरक्षा व हवामान बदलाचे परिणाम या चार विषयावर चार छोट्या नाटिका सादर करण्यात आल्या. चीनमध्ये सध्या थैमान घातलेला कोरोना व्हायरस नक्की काय व आपण कशी काळजी घ्यावी? याबद्दल डॉ. स्वाती टिकेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सचिन शिंदे यांनी एचआयव्ही /एड्स हा व्हायरस वा बिमारी नाहीच, यावर आपले मत मांडले.

वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छ संस्थेचे बाणेर भागातील 26 कर्मचारी व पुणे मनपाचे स्थायी व कंत्राटी असे १६ काचरा वेचक व स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहनापर बक्षीस देऊन यावेळी गौरव करण्यात आला.राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते आदि मान्यवरांनी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी. तसेच हवामान साक्षरता निर्माण व्हावी, हा आमचा हेतू असल्याचे आयोजक आणि कार्यकर्त्यानी यांनी सांगितले.

सायंकाळी नाशिकचे ह.भ.प. भगीरथ महाराज काळे यांच्या समाजप्रबोधनात्मक कीर्तनाने या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची अध्यात्मिक सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.