Pimpri: तळवडेच्या ताम्हाणे वस्तीतील दोघांचे मोशीतील एका महिलेचा रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’

कोरोना बाधितांचा आकडा 167 वर; 65 जण कोरोनामुक्त, सात जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडेतील ताम्हाणे वस्ती भागातील युवक, वृद्ध महिला आणि मोशीतील 33 वर्षीय महिलेचे असे तिघांचे आज (शुक्रवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 80 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 167 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 65 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने गुरुवारी (दि. 7) 176 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यामध्ये ताम्हाणे वस्ती येथील 29 वर्षाचा युवक आणि 75 वर्षीय वृद्ध महिलेचे आणि मोशीतील 33 वर्षाच्या महिलेचे असे तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात अशा सात जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.