Pune : कोरोनाचे आज 291 रुग्ण आढळले ; 189 जणांना डिस्चार्ज, 14 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी तब्बल 291 रुग्ण नावीन आढळले. तर, या रोगामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. 189 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुण्यातील मृतांचा आकडा आता 241 झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 398 रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत 1 हजार 86 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 169 गंभीर रुग्ण असून, 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आज 1 हजार 735 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या.

ससून रुग्णालयात  कोंढाव्यातील 33 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 70 आणि 62 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 72 वर्षीय महिलेचा, घोरपडीतील 45 वर्षीय महिलेचा, नानापेठेतील 48 वर्षीय पुरुषाचा, केशवनगरमधील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, श्वसनाचा विकार, हृदयाचा व किडनीचा आजार होता.

तर, नाना पेठेतील 40 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडीतील 70 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये, पुणे कॅम्पमधील 69 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, बंडगार्डनमधील 80 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 90 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 93 वर्षीय पुरुषाचा बुधारणी हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 57 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

मृतांमध्ये  9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात 5 हजार 14 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 212  आहे

कोरोनाबाधित एकूण 250  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आज नव्याने तब्बल 297 कोरोनाचे रुग्ण आढळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.