Chetan Chauhan Passes Away: माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

Former India cricketer Chetan Chauhan passes away मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते.

एमपीसी न्यूज – माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती.

कोरोनामुळे चेतन चौहान यांच्या किडनीमध्ये संक्रमण वाढले होते. शनिवारी संध्याकाळी चेतन चौहान यांना लखनऊच्या पीजीआयमधून गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत होते.

गेल्या महिन्यात चेतन चौहान यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. किडनीमध्ये कोरोनाचे विषाणू गेल्यामुळे शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. भारतीय संघाचे माजी फलंदाज असलेले चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगांवा विधानसभेतील आमदार होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी चेतन चौहान यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चेतन चौहान यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. सुनील गावस्कर आणि त्यांची जोडी सलामीला येत असे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.