Lonavala News: लोणावळा शहरासाठीच्या मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज (दि.16) मावळ तालुक्याचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते पार पडला.

एमपीसी न्यूज- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या 30 व्या वाढदिवसाच्या निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने 30 रुग्णवाहिकाचे हस्तांतरण विविध भागात करण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्णवाहिका लोणावळा शहरासाठी देण्यात आली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज (दि.16) मावळ तालुक्याचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी, मुख्याधिकारी रवी पवार, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, काँग्रेस शहराध्यक्ष विलास बडेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी, कम्मूभाई जस्दनवाला, डॉ. अमोल आगरवाल, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, मोरेश्वर देवकर, शाखाप्रमुख सुनील इंगूळकर, विशाल पाठारे, सतीश गोणते, शामबाबू वाल्मिकी, नरेश घोलप, ओमकार खराडे, सचिन वाळके, दत्ता दळवी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा व परिसरातील नागरिकांना या रुग्णवाहिकेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.