Farmer Protest: हिंसाचारानंतर चारशेहून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा जास्त आंदोलन करणारे शेतकरी बेपत्ता आहेत. पंजाबमधील शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांनी चारशेहून अधिक शेतकरी आणि तरुण बेपत्ता असल्याचा आरोप केला आहे.

केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले दोन महिने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर शांततेत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 18 शेतकर्‍यांना अटक केल्याचं सांगितलं. उर्वरित शेतकर्‍यांबाबत कोणतीही माहिती नाही, यामुळे त्यांचे कुटुंब चिंतीत आहे. शेतकरी बेपत्ता होण्यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.

पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांनी असा आरोप केला आहे की दिल्ली हिंसाचारादरम्यान 400 हून अधिक तरूण आणि वृद्ध शेतकरी बेपत्ता आहेत. त्याचबरोबर काही संघटनांनी असा आरोपही केला आहे की बेपत्ता झालेले लोक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर अमृतसर लखरा मिशन नावाच्या संस्थेकडून या विषयाबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचा निर्णयही घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.