Pune Crime News : गुरुद्वाराच्या बांधकामाच्या हिशोबावरून दोन गटात तुफान हाणामारी, सात जण अटकेत

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुद्वाराच्या

एमपीसी न्यूज – बांधकाम हिशोबाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. वानवडी पोलिसात याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी कृष्णासिंग कल्याणी (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय 47) व जसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय 42) हरपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय 30, कुंजरीवाडी), हासपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय 28) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या तक्रारीत नेपालसिंग कल्याणी (वय 70, रा. सोरतावाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिम्मतसिंग धारसिंग कल्याणी (वय 29), जलसिंग धारसिंग कल्याणी (वय 38), कृष्णासिंग धारसिंग कल्याणी (वय 37), यांना अटक केली आहे. तर त ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी कृष्णासिंग कल्याणी यांचे काही नातेवाईक हे गुरुद्वारा कमिटीचे सदस्य आहेत. हे सर्व गुरुद्वाराच्या बांधकामाचा हिशोब मागण्यासाठी गुरुद्वारा कमिटीच्या सदस्यांकडे आले होते. या हिशोबावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार काल दुपारी घडला आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करीत आरोपीना अटक केली. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.