Hinjawadi Crime News : शिवीगाळ करण्यास रोखल्याने महिलेचे कपडे फाडले; एकास अटक
एमपीसी न्यूज – घराजवळ येऊन फोनवर बोलत शिवीगाळ करणाऱ्यास इथे शिवीगाळ करू नको म्हटल्याने फोनवर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने महिलेचे कपडे फाडले. त्यानंतर दोन महिलांनी पीडित महिलेला मारहाण केली. हा प्रकार 29 मार्च रोजी सुसगाव येथे दुपारच्या वेळी घडला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
विनोद सुदाम जाधव (वय 35) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुनीता विनोद जाधव (वय 34), लीलाबाई पोपट मोहिते (वय 60, सर्व रा. सुसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने गुरुवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 29 मार्च रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या घरासमोर भांडी घासत होत्या. त्यावेळी आरोपी विनोद तिथे फोनवर बोलत आला. तो फोनवर मोठमोठ्याने शिव्या देत होता. त्यामुळे फिर्यादी महिलेने ‘इथे शिव्या देऊ नकोस. माझी मुले घरात आहेत’ असे आरोपीला सांगितले. त्यावरून आरोपी विनोद याने महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी सुनीता आणि लीलाबाई यांनी पीडित महिलेला हाताने व पायाने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.