Dehuroad Corona Update : 30 जणांना डिस्चार्ज, 19 नवे रुग्ण; एक मृत्यू , चिंचोलीत रुग्णवाढ कायम

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत बुधवारी (दि.14) एकूण 19  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आज कोरोना मुक्त झालेल्या 30 जणांना डिस्चार्ज तर हद्दीत 287 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1973  इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीत सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज कॅंटोन्मेंट हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. आज किन्हई येथील 84  वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बुधवारी सायंकाळी रात्री आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 45  रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1648  रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

होम आयसोलेशनमध्ये 180  रुग्ण आहेत. महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  60  रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 2  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 38  मृत्यूंची नोंद झाली आहे.

बुधवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

चिंचोली (5), मामुर्डी (4), मेन बाजार (2), एलोरा सोसायटी ( 2), शितळानगर नं 1(1),  संकल्प नगरी (1), शिवाजी नगर (1), पारशी चाळ (1),सौदागर नगरी (1), किन्हई (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.