Pune News : येरवड्यात चौकात थांबण्यावरून खुन्नस, तरुणावर कोयत्याने वार
एमपीसी न्यूज : घराजवळील चौकात थांबण्यावरून झालेल्या वादानंतर दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. येरवड्यातील दीदार बेकरी समोरील आर के चौकाजवळ हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश पिसे आणि फरदीन फय्याज अन्सारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वसीम खुर्शीद शहा (वय 32) यांनी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीचा भाऊ मोहसीन आणि त्याचा मित्र आकाश काळोखे हे चौकात गप्पा मारत बसले असताना चौकात थांबण्यावरून आणि खुन्नस देण्यावरून त्यांचे सागर हनुमंते याच्याशी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून सागर हनुमंते याच्यासोबत राहणाऱ्या वरील आरोपीने हातात कोयते घेऊन येरवड्यातील आर के चौकात दहशत पसरली.
आरोपी ऋषिकेश पिसे याने फिर्यादीच्या भावाजवळ येऊन ‘तू आमच्या अप्पाला खुन्नस देतो काय’ असं बोलून त्याच्या कपाळावर कोयत्याचा वार केला. तसेच लाथा-बुक्क्यांनी देखील मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.