Pimpri News: ‘ओमायक्रॉन’च्या धास्तीने लसीकरण वाढले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात परदेशातून आलेले तीन आणि त्यांच्या संपर्कातील तीन अशा सहा जणांचा ‘ओमायक्रॉन’ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना वाढतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील लसीकरण मंदावल्याची स्थिती होती. परंतु, शहरात ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळून आल्यावर लसीकरण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात 5 ते 18 डिसेंबर या कालावधीत 192, 983 जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली आहे.

आतापर्यंत शहरात ओमायक्रोनचे दहा रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा लस घेण्यासाठी धाव घेतली. सद्यस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे , असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली. तरी, गंभीर लक्षणे जाणवत नाही, असे आता पर्यंत दिसून आले आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी लस घ्यावी. यासाठी हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत 28 लाख 40 हजार 226 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

मागील काही दिवसात झालेले लसीकरण!
5 डिसेंबर -23,935
6 डिसेंबर -15,690
7 डिसेंबर – 20,663
8 डिसेंबर – 17,566
9 डिसेंबर – 2390
10 डिसेंबर – 22,597
11 डिसेंबर – 15,386
12 डिसेंबर – 19,468
13 डिसेंबर -11,487
14 डिसेंबर – 13,237
15 डिसेंबर – 11,955
16 डिसेंबर – 1329
17 डिसेंबर – 17,283
एकूण – 192, 983

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.