Khau Galli Inauguration : पवळे पुलाखाली क्रांती हॉकर झोनचे (खाऊ गल्लीचे) उद्घाटन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांना शिस्त लागणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांचा स्वयंरोजगार झाला पाहिजे.(Khau Galli Inauguration) महापालिकेचा त्यांना जाणून-बुजून त्रास देण्याचा कुठलाच उद्देश नसून मी स्वतः पाव व भाजी विकलेली आहे. असे विविध ठिकाणी हॉकर झोन करून त्यांना कायम जागा देणे गरजेचे आहे. आज अविरत प्रयत्नातून सुसज्ज हॉकर झोनची निर्मिती झाली याचा मला मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज (बुधवारी) निगडी येथील उड्डाणपुलाखाली क्रांती हॉकर झोनचे  (खाऊ गल्ली )उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, अ क्षेत्रीय  अधिकारी शितल वाकडे, फ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, वाहतूक पोलीस निरीक्षक विजया कारंडे,प्रहारचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे ,पोलीस निरीक्षक शंकर डामसे, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील पुढे  म्हणाले की, शहराचा विकास होत असताना शहरांमध्ये दर वर्षाला एक लाख लोकसंख्या वाढत आहे आणि त्याप्रमाणे नियोजन होणे गरजेचे आहे. शहरातल्या विविध ठिकाणच्या विक्रेत्यांसाठी आठवडे बाजार, भाजी मार्केट, खाऊ गल्ली असे विविध प्रयोग व विक्री केंद्र होणे गरजेचे आहे.(Khau Galli Inaugration) जेणेकरून नागरिकांना ते सोयीचे ठरेल .आज उद्घाटन झालेली खाऊ गल्ली ही कुठेही घाईगडबडीत अथवा अडचणीचं न ठरता ग्राहकांना या ठिकाणी बसून व्यवस्थित खाण्याचा आनंद घेता येणार आहे. म्हणून  योग्य नियोजनाबद्धल महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अभिनंदन केले आणि महापालिकेकडून जे जे सहकार्य लागेल तेथे फेरीवाला घटकासाठी प्रशासन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Bjp Central  Election  Committee : फडणवीसांची केंद्रात एन्ट्री; मोदींनी दिली देशभराची जबाबदारी

नखाते म्हणाले की, फेरीवाला हा पुरातन कालापासून आलेला  घटक आहे, गावाची शहर झाले आणि शहर झाल्यानंतर फेरीवाला अडचण ठरवू नका, शहराच्या विकासा आराखड्यामध्ये आम्हाला सामावून घ्यावे. महासंघाने व शहरातल्या सर्व फेरीवाल्यानी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पाठीमागे  ताकद उभी केल्याने फेरीवाल्यांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत. परंतु, आज हॅाकरची 20 ठिकाणी निर्मिती होत आहे, आम्ही अत्यंत समाधानी आहोत.(khau Galli Inaugration) पुढच्या कालावधीमध्ये ही संख्या वाढवून योग्य नियोजन होण्यासाठी महापालिकेसोबत महासंघ एकत्रितरित्या कामासाठी आम्ही पुढे येऊ. आयुक्त जसे कडक  शिस्तीचे आहेत तसेच ते निर्णयक्षम आहेत म्हणून आज आवर्जून कष्टकऱ्यांच्या उद्घाटनाला येऊन एक चांगली सुरुवात केली. याप्रसंगी विविध स्टॉलचे नियोजन व स्टेनलेस स्टीलच्यां बनवलेल्या हातगाड्या व त्याची रचनेबाबत आयुक्तांनी माहिती घेतली आणि नियोजनासाठी अधिकाऱ्यांना संबंधित सूचना दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फरीद शेख,अंबालाल सुखवाल, मनोज यादव,विशाल मेहेर,काशीम तांबोळी,नदीम पठाण, नाना कसबे, सुनिता जाधव नंदा तेलगोटे करिता वाठोरे रोहिदास शेख सुनंदा घोडके आदींनी परिश्रम केले. सूत्रसंचालन  राजेंद्र वाकचौरे यांनी केले तर आभार माधुरी जलमुलवार यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.