Bjp Central  Election  Committee : फडणवीसांची केंद्रात एन्ट्री; मोदींनी दिली देशभराची जबाबदारी

एमपीसी न्यूज – पक्ष निष्ठेचे फळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहे. पक्षाचे आदेश शिरसावंघ्य मानून उपमुख्यमंत्री पद घेतलेले देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी घोषणा करण्यात आली. त्यात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत सदस्य म्हणून फडणवीस यांची वर्णी लागली.

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. त्यात देशभरातील भाजपच्या 15 बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,बी.एस.येडुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, वनथी श्रीनिवास यांचा समावेश करण्यात आला आहे. बी.एल.संतोष हे सचिवपदी आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.