Pune News: पुण्यात शुक्रवारी रंगणार भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा

एमपीसी न्यूज : लष्कर बेडा पंचायत, गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्टच्या वतीने भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळ्याचे  येत्या शुक्रवारी (दि.19) आयोजन करण्यात आले आहे.(Pune News) हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री आठ वाजता गोगामेडी मंदिर,पूलगेट बसस्टॉप समोर,कॅम्प मध्ये होणार आहे.

Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण

हा सोहळा खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.(Pune News) काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे कँटोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, पोलिस उपायुक्त  सागर पाटील,शिवसेना नेते अजय भोसले,युक्रांदचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. या सोहळ्याचे संयोजक सुदेश सारवान यांनी ही माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.