Moshi News : मोशी येथे एका स्टॉलला आग
एमपीसी न्यूज – मोशी येथे एका स्टॉलला शुक्रवारी पहाटे आग लागून सर्व साहित्य खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चिखली कार्यालयाने सांगितले की पुणे – नाशिक महामार्गावरील मोशी पोलीस चौकीजवळ आज पहाटे 2.15 च्या सुमारास एका वडापावच्या स्टॉलला आग लागली होती.एक अग्निशमन बंब 2.22 वा तेथे पोहचून आग विझवण्यात आली.परंतु या आगीत स्टॉलचे सर्व साहित्य जळून खाक झाले.