Pimpri News : चाकण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली म्हणून शेतकऱ्याची पोलीस आयुक्ताकडे धाव

एमपीसी न्यूज -गवत कापणीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यावर चार ते पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला ( Pimpri News) असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्याने केला असून याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

प्रसाद किसन गव्हाणे (वय 40 रा. भोसे, खेड) यांनी पोलीस आयुक्तांना याप्रकरणी निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, गव्हाणे यांच्या वडिलोपार्जीत शेतात धोंडिबा मुंगसे व विश्वास बाबाजी मुंगसे यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह शेतातील गवत कापणीला सुरुवात केली. मात्र जमीन गव्हाणे यांची असल्याने गव्हाणे यांनी मुंगसेला जाब विचारला असता हि जमीन माझ्या बापाची आहे म्हणत त्यांनी विळ्याने गव्हाणे यांना मारहाण केली. हा सारा प्रकार 21 ऑक्टोबर 2022 रोजी घडला होता.

 

Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात शिक्षकांसाठी योग शिबीर

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार न घेता, कारणे सांगत तक्रार अजूनही नोंदवून घेतली नाही. उलट गव्हाणे यांच्यावरच 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. माझ्यावरती जिवघेणा हल्ला झाला तरी गुन्हा दाखल केला नाही मग जीवे ठार मारल्यानंतर गुन्हा दाखल होईल का, असा सवालही गव्हाणे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.