Mhalunge : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज

एमपीसी न्यूज – जीव मारण्याची धमकी देत खंडणी (Mhalunge) स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. हा प्रकार 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकण, खराबवाडी परिसरात घडला.

गणेश नंदू राऊत (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ मुकुंद काचोळे (वय 23), विठ्ठल राजकुमार दशवंत (वय 21), हृतिक रमेश माकर (वय 21, तिघे रा. रोहकल, ता. खेड), ओंकार बापू रसाळ (वय 21, रा. भाम, ता. खेड), मयूर संतोष इंगळे (वय 22, रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : इतके असंवेदनशील असू नये – सुप्रिया सुळे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ याने फिर्यादी यांना फोन करून खराबवाडी येथील एका सोसायटीच्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे गौण खनिज त्याला देण्याची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी गौण खनिजाची रक्कम सांगितली. त्यावरून सोमनाथ याने फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली.(Mhalunge) तसेच गौण खनिज दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी गौण खनिज खंडणी स्वरूपात देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.