Pune : विठ्ठल नामाच्या जयघोषात ज्ञानोबा व तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान
एमपीसी न्यूज – माउली माउलीचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आज सकाळी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. ज्ञानोबांच्या पालखीनं आज सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी तर तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी प्रस्थान ठेवले.
सध्या ज्ञनोबांची पालखी भैरोबा नाल्यापर्यंत पोहोचली तुकोबांची पालखी ट्रायल चौकात पोहोचली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही पालख्या काल पुण्यात मुक्कामी होत्या. संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी विठोबा मंदिरात विसावली होती. याकाळात भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल पालख्यांचे दर्शन घेतले.