Dighi : घरफोडी करत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा एकूण 1 लाख 88 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई पार्क दिघी येथे मंगळवारी (दि. 19) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.

मधुकर मारुती शिंदे (वय 58, रा. गुरुदत्त कॉलनी, साई पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दोघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 18) रात्री सात ते मंगळवारी (दि. 19) सकाळी सहाच्या सुमारास शिंदे यांचे घर कुलूप लावून बंद होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 41.2 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि टीव्ही असा एकूण 1 लाख 88 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.