मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Suicide News : नवीन मोबाईल दिला नाही म्हणून 14 वर्षे मुलाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारंवार मागूनही आईने नवीन मोबाईल विकत घेऊन न दिल्याने एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलाने राहत्या घरात शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलाने एवढे मोठे पाऊल उचलल्याने बारामती तालुक्यातील लोकांना धक्का बसला आहे. गुरुवार (दि.२९ ) रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडे सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) हा सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर (वय २७) , रा. क-हावागज, लष्करवस्ती (ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
यावेळी शुभमने आपल्या आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने  आई मोबाईल घेवु शकली नाही, म्हणून अवघ्या चौदा वर्षाच्या शुभमने नैराश्यातुन  घराच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
Latest news
Related news