Kasarwadi Crime News : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सहा जणांचे टोळके भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. शुक्रवारी (दि.12) रात्री अकराच्या सुमारास सिंतागण गार्डन, कासारवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

साईराज दिवाकर वाघमारे (वय 20), सुरज राजू लांडगे (वय 22), राहुल शंकर मिरेकर (वय 20) शुभम बाबु कदम (वय 21), आकाश सोमनाथ जगधणे (वय 19) आणि प्रशांत श्रीसेल कासमे (वय 19) (सर्व रा, पिंपळे गुरव) असे अटक आरोपी यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी कोयते, ब्लेड, लाकडी दांडके, स्क्रु ड्रायव्हर, हातोडी, मिरची पूड यासारखे मनाई असलेले साहित्य जवळ बाळगून, दरोड्याच्या तयारीत होते. दरम्यान भोसरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.