Talegaon Dabhade : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मावळ भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – तळेगाव आगार येथे सुरू असलेल्या एस.टी. कामगारांच्या आंदोलनास तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना रवींद्र भेगडे म्हणाले, ‘आज महाराष्ट्रातील जवळ जवळ 34 पेक्षा जास्त एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत एकीकडे एस.टी. कामगार आत्महत्या करत असताना सुद्धा राज्यशासनाने दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. राज्यशासनाने निलंबनाची कारवाई न करता लवकरात लवकर एस.टी. कामगारांच्या मागण्या तात्काळ मान्य करून एस.टी. कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर येण्यापासून रोखावे.’

तसेच, महाराष्ट्रातील सर्व एस.टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपण लोकशाही मार्गाने आपला लढा यशस्वी करू, आपणाला विश्वास देतो की राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शासन दरबारी आपली बाजू मांडून आपल्या सर्व मागण्या या राज्यसरकारकडून पूर्ण करून घेतील परंतु आपण कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये व कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन देखील भेगडे यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.