-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : बदनामीची धमकी देऊन नामांकित दूध कंपनीकडून 20 लाखाची खंडणी उकळली

तिघांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज :  पुण्यातील नामांकित दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगून त्या आडून ब्लॅकमेल करत वीस लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना बिबेवाडी पोलिसांनी अटक केली. 2 जून ते 17 जून या कालावधीत हा प्रकार घडला. 

करण सुनिल परदेशी (वय 22), सुनील बेन्नी परदेशी (वय 49) अक्षय मनोज कार्तिक (वय 27) पुनम सुनिल परदेशी (वय 27) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील करण, सुनील आणि अक्षय या तिघांना अटक करण्यात आली आहे. नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी या प्रकरणी बिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुनम परदेशी यांनी बी जी चितळे ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेल द्वारे चितळे दुधामध्ये काळा रंगाचा पदार्थ आढळल्याबाबत तक्रार दिली होती. तर इतर आरोपींनी हे प्रकरण लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद पाडू, तुमची बदनामी करू अशी धमकी देत फिर्यादीकडे वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

बदनामीच्या भीतीने शितोळे कंपनीने आरोपींना वीस लाख रुपये दिले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.