Pune News : भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या टेम्पोला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. उरळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरात ही घटना घडली.

समीर कासिम पठाण (वय 19, चंदनवाडी, उरुळी कांचन, भोरी भडक) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 30 एप्रिल च्या रात्री समीर पठाण हा दुचाकीने जात असताना भरधाव वेगातील त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेने असणाऱ्या टेम्पोच्या बम्परला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने समीर त्याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.