Pimpri News : एक मिसकॉल देऊन आम आदमी पार्टीचे सदस्य होता येणार; आपचे सदस्य नोंदणी अभियान

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने मिस-कॉलद्वारे सदस्य नोंदणी आणि आप पिंपरी-चिंचवडच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले.

पंजाब विधानसभा निकालानंतर आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर नऊ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आपने अल्पावधीत दोन राज्यांमध्ये एक हाती सत्ता हस्तगत केल्याने आपला देशभरातील सर्वसामान्य जनतेमध्ये आशा जागृत झाल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना आपमध्ये सहजपणे सामील होण्यासाठी 903 906 906 5 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपचे सदस्य बनता येणार असल्याचे आप पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीच्या उपक्रमाची माहिती पिंपरी-चिंचवडकरांना व्हावी या उद्देशाने aappimprichinchwad.org ता वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.