Bhosari Crime News : केटीएम वरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे हिसकावले गंठण 

एमपीसी न्यूज – केटीएम वरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे गंठन हिसकावले. आळंदी रोड, एसपीजी शाळेसमोर रविवारी (दि.03) रात्री 09.45 वा ही घटना घडली.

वर्षा चिंतामण खेंगले (वय 40, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून केटीएम वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या त्यांचे जावई व मुलासोबत गाडीवरून कार्यक्रमासाठी जात होत्या. आळंदी रोड, एसपीजी शाळेसमोर आल्यावर केटीएम वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण हिसकावले. असे फिर्यादीत नमूद केलं आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.