23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

NCP News : आजी-माजी आमदारांच्या ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ मेळाव्यातील गैरहजेरीची चर्चा

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका भाजपकडून खेचण्याच्या संकल्प करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ मेळाव्याला पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे  गैरहजर होते. त्याचबरोबर माजी महापौर, मुख्य समन्वयक योगेश बहल, युवकांचे अध्यक्ष इम्रान शेख देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे यांच्या अनुउपस्थितीबाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु होती.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी)  चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ मेळावा पार पडला.

भविष्य आणि वेळ आपल्याकडेच राहणार आहे. कारण, घड्याळ हीच आपली खून आहे. आपली राष्ट्रवादी आपली पालिका ही मशाल पेटून कामाला लागा. विजय आपलाच आहे. पण, त्यासाठी कष्ट करा, संघर्षा करावा. संघर्षाशिवाय यश नाही, असे मार्गदर्शन पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले खरे पण शहरातील एकमेव आमदार असलेले अण्णा बनसोडे मेळाव्याला आले नव्हते. माजी आमदार विलास लांडे देखील गैरहजर होते. व्यासपाठीवार दोघांच्या नावासहित खुर्च्या आरक्षित केल्या होत्या. तरीही दोघेही उपस्थित नव्हतो. माजी महापौर योगेश बहलही उपस्थित नव्हते. त्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु होती.

आजी-माजी आमदारच येत नसतील तर पुन्हा महापालिकेत आपली सत्ता कशी येईल अशी चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती. दरम्यान, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे युवकांचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे यांनी सांगितले.

spot_img
Latest news
Related news