Pimpri News : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 442 चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri News) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली या मध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 442 वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.

 

पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवतात. या चालकांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी 9 ते 23 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवली.

Bhosari News – भोसरी एमआयडीसीमध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन

 

यामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 442 वाहन चालकांवर न्यायालयात खटले भरविण्यात आले. याव्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल करणाऱ्या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड (Pimpri News) वाहतूक शाखेचे मार्फत ही चलन प्रणाली द्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

 

वाहनांवरील दंडाची रक्कम ही मोठ्या प्रमाणात अनपेड असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी 52 लाख 73 हजार 650 रुपयांचा दंड वसूल केला.(Pimpri News) यापुढील काळात देखील वाहतूक पोलिसांकडून अशा मोहिमा राबवून कारवाई केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.