Alandi Chief Officer : आळंदी नगरपरिषदेच्या मुुुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (Alandi Chief Officer) पदावरून अंकुश जाधव यांची 29 डिसेंबरला बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायत पासून मुख्याधिकारी म्हणून कैलास केंद्रे (Alandi Chief Officer) यांची प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर सांगोला नगरपरिषदेमध्ये ते मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारा, सतत नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारा अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी, प्रशासकीय कामात व्यस्त असणारे आधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

New Year Photography Contest : नववर्षाच्या स्वागताचा फोटो क्लिक करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

राज्य शासनाच्या 16 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे शासनाचे महत्वकांक्षी अभियान राज्यभर राबविण्यात आले. त्यात 226 नगरपरिषदांच्या गटामध्ये सांगोला नगरपरिषदेने राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी कैलास केंद्रे हे सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.