Alandi News: ‘दारू का पिलात’ असे विचारणा-या पत्नीचे फोडले डोके; पतीला अटक

शिल्पा यांनी 'तुम्ही दारू का पिला' असे विचारले. याचा राग आल्याने राजेश याने शिल्पा यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याचे केस पकडून त्यांना जमिनीवर आपटले.

एमपीसी न्यूज – दारू पिऊन घरी आलेल्या पतीला पत्नीने ‘दारू का पिलात’ असे विचारले. या कारणावरून दारुड्या पतीने पत्नीला बेदम मारहाण करत पत्नीचे डोके फोडले. तसेच वडिलांना देखील मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.12) दुपारी साडेचार वाजता च-होली खुर्द येथे घडली.

राजेश भानुदास बिरासदार (रा.च-होली खुर्द, ता.खेड. मूळ रा. अचवला, जि.लातूर) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी पत्नी शिल्पा राजेश बिराजदार (वय 19) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिल्पा यांचा आरोपी पती राजेश बुधवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्यावरून शिल्पा यांनी ‘तुम्ही दारू का पिला’ असे विचारले. याचा राग आल्याने राजेश याने शिल्पा यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याचे केस पकडून त्यांना जमिनीवर आपटले. शिल्पा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी शिल्पा यांचे सासरे आले. आरोपी राजेश याने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ढकलून दिले. त्यात सासरे देखील जखमी झाले. याबाबत शिल्पा यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी राजेश याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.