Alandi : कोयाळी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरू असलेल्या (Alandi )दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख आठ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी 11 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi )फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Hinjawadi : किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावात भिवरेवाडी येथे पडीक जमिनीमध्ये एका महिलेने बेकायदेशीरपणे दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाख 8 हजार रुपये किमतीचे पाच हजार 400 लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.