Alandi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत पोलिसांचा रुट मार्च

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आळंदी ( Alandi)पोलिस स्टेशनच्या वतीने आज दि.16 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास  आळंदी शहरात पोलिसांचा  रुट मार्च काढण्यात आला.
या रुट मार्च ची सुरूवात आळंदी पोलीस स्टेशन पासून (Alandi)झाली.  तो रुट मार्च पालिका  चौक – महाद्वार चौक –  – घुंडरे आळी (- वडगांव चौक – मरकळ चौक – विठ्ठल रुक्मिणी चौक अश्या शहरातील विविध ठिकाणा पासून निघून शांतेत पार पडला.

Pune: ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे 568 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

तसेच सण उत्सवा (छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार), होळी धुलीवंदन, रमजान ईद) (Alandi)च्या अनुषंगान आळंदी पोलीस स्टेशन मध्ये बैठक पार पडणार आहे.

सदरचा रूट मार्च हा राजेंद्रसिंह गौर, सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग, बी. एस.नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला.
सदरचे रूट मार्च साठी सहा.पोलीस आयुक्त – 01, पोलीस निरीक्षक- 01, सपोनि/पोउपनि – 07, आळंदी पोलीस स्टेशन कडील अंमलदार – 18, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडील 02 अधिकारी 30 जवान, आरसीपी पथक – 18, माळुंगे पोस्ट – 08,चाकण पोस्ट – 05, MIDC भोसरी पोस्ट – 09, आळंदी पोलीस ठाणे कडील वन /टू /112 मोबाईल वाहन सदर रूट मार्चमध्ये हजर होते.

एकुण 09 अधिकारी 88 अंमलदार रूटमारसाठी हजर होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.