Sinhagad Road: सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे. मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली.

मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे 15 दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह 180 कोटींच्या विकास कामांचे होणार भूमिपूजन

विश्रांती नगर रस्ता, विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.