Wakad Crime News : महिलेची आर्थिक फसवणूक करून मॉर्फ केलेले अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवत बदनामी

एमपीसी न्यूज – महिलेचे कर्ज मंजूर करण्यासाठी तिच्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर तिच्या कागदपत्रांच्या आधारे तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर पाठवून बदनामी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मे ते 1 जून या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9477611900, 9647002978 या क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Crime News : हॉटेलमधील कामगारांना लुटण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला कर्ज पाहिजे होते. ते कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने आरोपींनी महिलेला फोन करून त्यांच्याकडून 10 हजार 489 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. कर्ज मंजूर न करता फिर्यादी महिलेची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचे फोटो मॉर्फ करून मॉर्फ केलेले अश्लील फोटो त्यांची मैत्रीण आणि चुलत्याच्या सोशल मीडियावर पाठवून बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.