Bhosari Metro Station : अमोल देशपांडे होणार भोसरी मेट्रो स्टेशनचे ब्रँड अँबॅसिडर

एमपीसी न्यूज –  अमोल देशपांडे यांची मेट्रो स्टेशनच्या (Bhosari Metro Station) नाशिकफाटा येथील स्थानकाच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मेट्रो संवाद अतंर्गत मेट्रो प्रशासन एमआयडीसी परिसर, शाळा, कंपनी, सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना यांच्यासाठी  ब्रँड अँबॅसिडरच्या सहाय्याने विविध उपक्रम राबविणार आहे.  

Pune Crime : दहीहंडी उत्सवाला गालबोट, पुण्यात सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

याविषयी अमोल देशपांडे यांनी त्यांचे मत व्यक्त करतना म्हटले की, 2014 साली मेट्रो निगडी पर्यंत यावी यासाठी पीसीसीएफ च्या माध्यमातून उभारलेला लढा यापासून सुरू झालेला प्रवास ते मेट्रो संवाद कार्यक्रमांचे आयोजन ते दिवंगत पुणे मेट्रो मॅन लिमये सरांशी सल्लामसलत ते स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागार म्हणून जॉईन केल्यानंतर ‘माझी स्मार्ट मेट्रो’ उपक्रमाची आखणी केली ज्यामध्ये 20 हजार पेक्षा अधिक नागरिकांना (Bhosari Metro Station) प्रत्यक्ष मेट्रो स्टेशन व मेट्रो अनुभवली, स्टेशनवर अनेक कार्यक्रम, स्पर्धा, Flea Market  यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले, नुकतेच पुणे मेट्रो प्रवासी या फेसबुक ग्रुपची सुरवात केली आणि काही दिवसांपूर्वी मेट्रोचा पिंपरी चिंचवड आणि पुणे विस्तार व लास्ट माईल कनेक्टेवीटी याबाबात वरिष्ठ पातळीवर सूचना देण्याची संधी मिळाली. या सर्व बाबी लक्षात घेऊन मला हा सन्मान मिळाला आहे. या नव्या जबाबदारीमुळे स्मार्ट सिटीसाठी सिटीझन कनेक्ट या माझ्या कामामध्ये मला अधिक मदत मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.