Khadki : खडकीतून परदेशी नागरिकाला सात लाखांच्या अंमली पदार्थासह अटक

एमपीसी न्यूज – खडकी येथे छापा मारत पोलिसांनी युगांडा (Khadki) येथील एका नागरिकाकडून तब्बल सात लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ज्यामध्ये मेफेड्रॉन व मॅथेक्युलॉन यांचा समावेश आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी शाखा दोनच्या पथकाने केली आहे.

नसुबग इस्माईल (वय 23 सध्या रा. औंध मुळ युगांडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासी पथक खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, खडकी बाजार येथे एक परदेशी नागरिक हा विक्रीसाठी अंमली पदार्थ घेऊन थांबला आहे.

Bhosari Metro Station : अमोल देशपांडे होणार भोसरी मेट्रो स्टेशनचे ब्रँड अम्बेसिटर

मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या जवळून पोलिसांनी 4 लाख 57 हजार 800 रुपयांचे  32 ग्रॅम 7 मीलीग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन तर 2 लाख 62 हजार 400 रुपयांचे 16 ग्रॅम 4 मीली ग्रॅम वजनाचे मॅथेक्यूलॉन हे अंमली पदार्थ व पाच हजार रुपयांचा  मोबाईल तसेच रोख 5 हजार असा एकूण 7 लाख 30 हजार 200 रुपयांचा एवज जप्त केला. या आधीही पुणे पोलिसांनी काही नायजेरीयन नागरिकांना अंमली पदार्थाची विक्री करताना अटक केली होती. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एन.डी.पी.एस अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून खडकी पोलीस याचा पुढिल तपास (Khadki) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.