Wakad : व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – टेडी आणि ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय असलेल्या तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्या सुमारास डांगे चौक, काळा खडक रोड, थेरगाव (Wakad) येथे घडली.

Mp Shrirang Barne: अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा

विशाल कसबे (रा. काळा खडक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विनय कृष्णा यादव (वय 24, रा. थेरगाव. मूळ रा. बिहार) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टेडी व ब्लॅंकेट विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

पैशांची आणि ब्लॅंकेटची मागणी करून ते देण्यास नकार दिल्याने कोयता काढून फिर्यादी यांच्या गळ्याच्या दिशेने भिरकावला. तो बार फिर्यादी यांनी चुकवला. यानंतर आरोपीने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.