Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – फोनवर अश्लील भाषेत बोलून तसेच प्रत्यक्षात महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर 2022 ते 27 जुलै 2023 या कालावधीत नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे घडली.

Wakad : व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश नथू बोराटे (रा. मोशी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कारचा हिशोब देण्याचा बहाणा करून फिर्यादी महिलेशी गैरवर्तन केले. तसेच महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. महिलेने फोनवर बोलणे टाळले असल्याने आरोपीने 27 जुलै रोजी पुन्हा फोन करून महिलेस अश्लील शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.