Weather News today : शुक्रवारी दुसरे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज

एमपीसी न्यूज : तामिळनाडूला निवार चक्रीवादळ धडकून आठवडा पूर्ण होण्याच्या आतच आता दुसऱ्या चक्रीवादळाचा या राज्याला शुक्रवारी,  4 डिसेंबर रोजी तडाखा बसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या खात्याने सदर दोन राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे दुसरे चक्रीवादळ घोंघावणार आहे. त्यावेळी ताशी ७५ ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दुसऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडू, केरळमधील मच्छीमारांनी शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात २६ नोव्हेंबरला निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू, पुडुचेरीला धडकले होते. त्यामुळे तेथील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला व पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवार चक्रीवादळामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.