Pune News : आणखी एकाचा खून ! दत्तवाडीत डोक्यात दगड घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज : बिबवेवाडीतील 14 वर्षीय मुलीचा खुन करणारे आरोपिंचा शोध सुरू असतानाच दत्तवाडीतून निर्घृण खुनाची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट काढून आरोपी पसार झाले. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

 योगेश अंकुश भोकरे ( जनता वसाहत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आदिती भोकरे (वय 31) यांनी तक्रार दिली असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक 23 मध्ये राहणारे योगेश भोकरे हे मंगळवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास औषध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री उशिरा झाला तरी पती न आल्यामुळे त्यांच्या पत्नी चिंचेत होत्या. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जनता वसाहतीतील रामकृष्ण मठाच्या पाठीमागे कॅनॉल रोडवर योगेश भोकरे यांचा मृतदेह सापडला.

अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून दगडाने त्यांचा चेहरा ठेचण्यात आला होता. तर आरोपीनी जाता जाता त्यांची पॅन्ट देखील काढून नेली. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.