Bank Manager Cheated : सोशल मीडियावर ओळख, गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने बँक मॅनेजर महिलेची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर एका बँक मॅनेजर महिलेला (Bank Manager Cheated)  महागड्या वस्तू भेट म्हणून पाठवण्याचे आमिष दाखवून या महिलेची तब्बल दहा लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. एका 33 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मार्च ते 25 एप्रिल या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. 

 

 

Prakash Amte : प्रकाश आमटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच सुरू होणार किमो थेरपी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या एका नामांकित बँकेत मॅनेजर पदावर काम करतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून त्यांची एरीक जॉन या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघे एकमेकांचा सातत्याने संपर्कात होते. दरम्यान आरोपी व्यक्तीने काही दिवस या महिलेशी  (Bank Manager Cheated) बोलल्यानंतर तीला महागडे गिफ्ट पाठवण्याचे आमिष दिले. त्यानंतर आयपॅड, सोन्याची चैन, परफ्युम आणि महागडे घड्याळ कुरियरने पाठवल्याचे सांगितले.

दरम्यान या सर्व वस्तू दिल्ली विमानतळावरील कस्टम ऑफिसमध्ये अडकल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. या वस्तू सोडवून घेण्यासाठी काही पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी सांगितल्यानुसार फिर्यादी महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यात दहा लाख आठ हजार रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान आणखी पैशाची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून फसवणूकीची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.