Wakad News : मारहाण करत व्यावसायिकाला लुटले

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने व्यावसायिकाला त्याच्या दुकानात नेऊन बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, दागिने काढून घेतले. ही घटना 16 डिसेंबर रात्री साडेअकरा ते 17 डिसेंबर सव्वाचार वाजताच्या कालावधीत डांगे चौक, वाकड येथे घडली.

अतिशकुमार मछिंद्र शिंदे (वय 31, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इम्तियाज घोडेवाला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घोडेवाला याने फिर्यादी यांना त्याच्या डांगे चौकातील दुकानात नेले. दुकानात नेऊन त्यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात फिर्यादी यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर घोडेवाला याने फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने रोख रक्कम, मोबाईल फोन, सोन्याची अंगठी असा एकूण 19 हजारांचा ऐवज घेतला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.