Betting on matches: क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी आरोपीस दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज: क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी आरोपीस दरोडा विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. (Betting on matches) विनायक शेलार, वय 50 वर्षे, रा. मोहननगर चिंचवड याला 2 ऑगस्टला रात्री 10.20 वा ची सुमारास अटक करण्यात आले आहे.

अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस आयुक्ताल्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर करावाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्देशवर कैलासे व पोलीस अंमलदार मिळून पोलीस आयुक्ताल्याच्या हद्दीत 2 ऑगस्टला रात्री गस्त घालत होते. त्यावेळेस इंगवले यांना खात्रीशीर बातमी मिळाली की सर्वे नंबर 136, मोहननगर, चिंचवड येथे एक इसम क्रिकेट मॅचवर बेकायदेशीर बेटिंग(सट्टा)लावत आहे.

Nitin Gadkari On Toll: टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा

 

त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन दरोडा विरोधी पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला व छापा टाकून आरोपी शेलारला ताब्यात घेतले. (Betting On Matches) तो इंडिया – वेस्ट इंडिज टी 20 सामन्याचे मोबाईल मध्ये असलेले CRICKET MAZA, Cricket line guru या अँप द्वारे बेटिंग घेत असल्याचे निष्पन्न झाले.

 

त्याच्याकडून 1,14,540 रुपये किंमतीचे एकूण 6 मोबाईल फोन, इंटरनेट राउटर, इत्यादी मुद्देमाल मिळाला आहे. (Betting On Matches) त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4 व 5, इंडियन टेलिग्राफ अँक्ट 25(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.