Pune News : बेकायदा कामगार कपातीविरुद्ध भारतीय कामगार सेनेचे आंदोलन

या तथाकथित प्रथितयश संस्थेने या कामगारांचे निलंबन रद्द करावे, अन्यथा भारतीय कामगार सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा

एमपीसी न्यूज – बेकायदा कामगार कपात केल्यामुळे भारतीय कामगार सेनेच्या वतीने शनिवारी (दि. 12 सप्टेंबर) डेक्कन जिमखाना क्लब विरुद्ध आंदोलन करण्यात आले.

डेक्कन जिमखाना क्लब व्यवस्थापनाने 2 सप्टेंबर रोजी दोन महिला व एक पुरुष कर्मचार्‍यांना बेकायदेशीररित्या कोव्हीड 19 चे कारण दाखवून कामावरून काढून टाकले. या अन्यायाच्या विरोधात भारतीय कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या पुढाकाराने डेक्कन जिमखाना क्लब मेन गेट येथे आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकार यांनी साथी रोग कायदा 1877 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि दिनांक 24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू साथ लागू झाला आहे. त्यात कुठल्याही कर्मचा-यास, कामगारास कमी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे कुचिक यांनी यावेळी सांगितल.

तसेत या क्लबची आर्थिक बाजू उत्तम असून जवळजवळ 6 कोटी रुपयांची कामे आजूनही सुरू आहेत. या तथाकथित प्रथितयश संस्थेने या कामगारांचे निलंबन रद्द करावे, अन्यथा भारतीय कामगार सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.