Bhor :आपला परिवार सोशल फाउंडेशन तर्फे “एक हात मदतीचा” उपक्रम साजरा

एमपीसी न्यूज : आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे (Bhor)या संस्थेच्या माध्यमातून ऋण समाजाचे अर्थात “एक हात मदतीचा”या सदराखाली भोर तालुक्यातील डोंगरी दुर्गम आठ गावातील आठ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व गरजू डोंगरी 108 कुटूंबिंयाना किरणांचा बाजार किट वाटण्यात आले.

या प्रसंगी एकूणच 600 हून अधिक सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने (Bhor)मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने पुर्ण वर्षेभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात. मकरसंक्रात, स्वच्छता अभियान, ऑक्सिजन फॅक्टरी अर्थात वृक्षारोपण आणि एक हात मदतीचा हे उपक्रम प्रामुख्याने सर्व समावेशक सदस्यांबरोबर साजरे केले जातात.

Pune : हॉकी स्पर्धेत मुलांच्या गटात लॉयला तर मुलींच्या गटात सेंट जोसेफचे एकतर्फी विजेतेपद

अनेक मान्यवर संस्थानी मैत्री भूषण-2019, उपक्रमशिल संस्था-2020, पर्यावरण मित्र-2021, समाज भूषण-2022 असे अनेक पुरस्कार देऊन या संस्थेला गौरविण्यात आले आहे.

“प्लास्टिक मुक्त भारत देश माझा”या उपक्रमात पुर्ण पुणे जिल्ह्यात फक्त एक तासात एक लाख सदस्यांना संदेश देण्यासाठी 10000 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

आजच्या “एक हात मदतीचा”या उपक्रमासाठी कोढंरी,धामणदेव,हिर्डोशी… गावातील शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते .

या प्रसंगी आपला परिवार संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री एस आर शिंदे यांनी सर्व डोंगर परिसरातील शेतकरी कुटूंबिंयाची व्यथा मांडत परिस्थितीपेक्षा आपली मनस्थिती कसी महत्त्वाची आहे याची पुणेकरांना जाणीव करुन दिली.

या उपक्रमासाठी कोढंरी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सरांनी या परिसर आणि ऐतिहासिक वारसासंबधी मनोगत व्यक्त केले.शाळा केंद्र प्रमुख अलका पवार मॅडम यांनी आपल्या परिवाराचे आणि संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी कोंढरी गावचे सरपंच, पोलीस पाटील,ग्रामस्थ आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार श्री विजय शिर्के,adv.गिरीश काटे,ऊल्हास तापकीर, उद्धव वांजळे ,भगंवत थोरात,प्रविण जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला.

संस्थेचे सेक्रेटरी श्री दत्तात्रेय बोराडे यांनी तर सूत्रसंचालन श्री राजेन्द्र थिगळे यांनी केले. त्याचप्रमाणे राजेश देशमुख आणिता होनराव महेश बारसावडे सचिन गावडे यांनी व इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.