Bhosari : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन महिलेला फसवले

एमपीसी न्यूज – खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन दोघांनी (Bhosari ) एका महिलेला फसवले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी सव्वा दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्याकडे असलेले खोटे सोन्याचे बिस्कीट फिर्यादीला दिले.

Talegaon Dabhade : प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ नाटक यांचे निधन

त्याबदल्यात फिर्यादीकडून एक तोळे वजनाच्या 15 हजार रुपये किमतीच्या कानातील कुड्या नेल्या. बिस्कीट खोटे असल्याचे (Bhosari ) लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.