Bhosari Crime News : साडेसात लाखांचा भरलेला माल घेऊन टेम्पोचालक पसार

एमपीसी न्यूज – एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी टेम्पोमध्ये भरलेला साडेसात लाखांचा माल घेऊन टेम्पोचालक पळून गेला. हा प्रकार 30 मार्च रोजी दुपारी भोसरी एमआयडीसीमध्ये घडली. याबाबत 10 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळूराम फक्कड रणपिसे (वय 46, रा. शिवाजीनगर, चाकण) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी कारभारी आहेर (रा. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी टेम्पो (एम एच 04 / ई वाय 6804) चालक आहे. त्याच्या टेम्पोमध्ये एमआयडीसी भोसरी मधील थर्मल इंजिनिअरिंग सिस्टिम्स या कंपनीतून सात लाख 50 हजार 160 रुपये किमतीचे इंटरनल बर्नर असेम्बली यु एफ 2060 हे आठ जॉब भरले.

हे जॉब निगडी येथील असोसीएटेड रोड कॅरीअर्स येथे पोहोच करायचे होते. आरोपी टेम्पो चालक शिवाजी हे जॉब घेऊन निगडी येथे पोहोच न करता टेम्पोसह पळून गेला. याबाबत 10 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.