Bhosari : बँकेने सील केलेल्या सदनिकेवर अतिक्रमण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हप्ते थकल्याने बँकेने सील केलेल्या ( Bhosari) सदनिकेत दोघांनी अतिक्रमण केले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत भोसरी येथे घडला.

पांडुरंग रामराव नेळगे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राधिकृत अधिकारी राजू मल्लाप्पा सोंदलगेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत – अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेतून आरोपींनी गृह कर्ज घेतले होते. मात्र आरोपींनी गृह कर्जाचे हप्ते थकवले. याबाबत बँकेने तोंडी सूचना आणि कायदेशीर नोटीसा बजावल्या होत्या. तरीदेखील घराचे ( Bhosari) हप्ते न भरल्याने बँकेने संबंधित सदनिका सील केली. बँकेने सील केलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून आरोपींनी अनधिकृतपणे गृह अतिक्रमण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.