Bhosari : व्यवसायात अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – राईस पुलींगच्या व्यवसायात सुमारे 30 कोटी कमिशन मिळवून देतो, असे सांगत तिघांनी एकाची एक कोटी 33 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

अरविंद कारभारी गागरे (वय 48, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कलीम शेख (रा. मुंबई. पुर्ण नाव, पत्ता माहिती नाही), विकास सिंग (रा. जमशेदपूर. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि बिलाव हरन डे ऊर्फ राजीव बॅनर्जी (रा. कलकत्ता. पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2016 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी गागरे यांचा विश्‍वास संपादन केला. राईस पुलींग (आर.पी.)च्या व्यवसायात 30 कोटी रुपयांचे कमिशन मिळवून देण्याचे अरविंद यांना आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी अरविंद यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी 33 लाख 95 हजार रुपये घेतले.

पैसे घेऊन त्यांना आजपर्यंत कोणताही मोबदला न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.